
श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांना अटक
श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांना अटक
कोलंबो वृत्तसंस्था श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांना सरकारी निधीचा दुरुपयोग केल्याच्या आरोपाखाली आज अटक करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. सरकारी निधीच्या गैरवापराच्या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी विक्रमसिंघे यांना क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये पाचटारण करण्यात आले होते.
तेथेच त्यांना अटक करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
विक्रमसिंघे यांनी परदेश प्रवासासाठी सरकारी निधीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विक्रमसिंघे यांच्या पत्नी प्रो. मैत्री यांच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सप्टेंबर २०२३मध्ये विक्रमसिंघे इंग्लंडला गेले होते.
सरकारी भेटीसाठी अमेरिकेला गेले असताना तेथून परत येत असताना सरकारी खर्चाने खासगी कामासाठी ब्रिटनला थांबल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणी सीआयडीने विक्रमसिंघे यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती. प्रवास खर्चाबाबत त्यांच्याकडे चौकशी केली गेली होती.
श्रीलंकेच्या आर्थिक अडचणीच्या काळात तत्कालिन अध्यक्ष गोटाबाये राजपक्षे यांच्या जागेवर उर्विरित मुदत पूर्ण करण्यासाठी रनिल विक्रमसिंघे यांची देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची अध्यक्षपदाची मुदत २०२२ च्या जुलैपासून २०२४ च्या सप्टेंबरपर्यंत होती. त्यानंतर झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते.
श्रीलंकेच्या कठिण काळात देशाचे नेतृत्व करून आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. रनिल विक्रमसिंघे यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तब्बल ६ वेळा जबाबदारी देखील सांभाळली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम