
‘श्री गौ कृपा कथा’ला ११ नोव्हेंबरपासून सुरुवात; पू. साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदींच्या मुखातून रसपूर्ण प्रवचन
‘श्री गौ कृपा कथा’ला ११ नोव्हेंबरपासून सुरुवात; पू. साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदींच्या मुखातून रसपूर्ण प्रवचन
श्री पांजरापोळ ‘गौतिर्थ’ संस्थेतर्फे आयोजन; शेवटच्या दिवशी स्वामी गोपालानंद यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन
जळगाव : भारतीय संस्कृतीत पवित्रतेचे व मातृत्वाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गौमातेची सेवा सर्वश्रेष्ठ मानली जाते. या गौसेवेच्या भावनेतून श्री पांजरापोळ ‘गौतिर्थ’ संस्थेतर्फे येत्या मंगळवार, ११ नोव्हेंबरपासून शनिवार, १५ नोव्हेंबरपर्यंत ‘भव्य श्री गौ कृपा कथा’ या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध कथा वाचक व गौसेवा जनजागृती अभियानाची प्रेरक, पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदी यांच्या मुखातून ही कथा सादर होणार आहे. त्या दररोज दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत नेरी नाका जवळील पांजरापोळ प्रांगणात प्रवचन करतील.
श्री पांजरापोळ ‘गौतिर्थ’ संस्थेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कथेच्या अंतिम दिवशी पूज्य स्वामी गोपालाचार्य स्वामी गोपालानंद सरस्वती गौआधारित आरोग्यविषयक ज्ञानप्रद मार्गदर्शन करतील.
या पवित्र व ज्ञानवर्धक सोहळ्यात अधिकाधिक भाविकांनी परिवारासह सहभागी होऊन पुण्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री पांजरापोळ ‘गौतिर्थ’ संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम