
श्री चक्रधर स्वामींच्या ८०३ व्या अवतार दिनानिमित्त खामगावात भव्य बाईक रॅली
श्री चक्रधर स्वामींच्या ८०३ व्या अवतार दिनानिमित्त खामगावात भव्य बाईक रॅली
खामगाव: सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या ८०३ व्या अवतार दिनानिमित्त खामगाव येथे २५ ऑगस्ट रोजी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद, श्री क्षेत्र जाळीचादेव शाखा-खामगाव तालुका यांच्या वतीने ही रॅली काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गांवरून फिरताना या रॅलीचे विविध मंडळांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
श्री चंदनशेष मंडळाकडून स्वागत सकाळी १० वाजता पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावरून निघालेली ही रॅली अमृत नगर, जलंब नाका, सिव्हिल कोर्टसमोरून टॉवर चौकमार्गे श्री चंदनशेष चौकात पोहोचली. येथे श्री चंदनशेष गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष राजेश आटोळे आणि संजूभाऊ शर्मा यांच्या हस्ते श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ‘श्री चक्रधर स्वामी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. श्री चंदनशेष मंडळाचे प्रताप कदम, बाळू इंगळे, सत्तु शर्मा, अतुल संत, संतोष आटोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहराच्या प्रमुख मार्गांनी प्रवास केल्यानंतर या रॅलीचा समारोप श्री दत्त मंदिर मांडका येथे झाला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम