
श्री मलंग गड यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
श्री मलंग गड यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
कल्याण प्रतिनिधी
हिंदूंची वहिवाट हीच मलंगगड मुक्तीची पहाट’ हा उत्स्फूर्त असा मंत्र देत माघ पौर्णिमेला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी श्री मलंगगड उत्सव सुरू केला होता. धर्मवीर दिघे यांनी सुरु केलेल्या या धार्मिक उत्सवाचा वारसा राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जपला आणि आजही तितक्याच उत्साहात गडावर हा धार्मिक उत्सव पार पडतो. दरवर्षी या उत्सवाला राज्यभरातून अनेक भाविक गडावर येतात आणि अगदी जल्लोषात हा उत्सव साजरा करतात. याच उत्सवाच्या निमित्ताने आज श्री मलंगगड देवस्थानी जात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे श्री मलंग मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आरती केली.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी दिलेल्या ‘श्री मत्स्येंद्रनाथ महाराज की जय’ अशा घोषणांनी श्री मलंगगड परिसर दुमदुमला होता.
यावेळी आमदार राजेश मोरे, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह शिवसेनेतील स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम