‘संगीत के प्रणेता २ दिवसीय संगीत समारोहात रसिक श्रोते मंत्रमुग्ध..

बातमी शेअर करा...
‘संगीत के प्रणेता २ दिवसीय संगीत समारोहात रसिक श्रोते मंत्रमुग्ध..
जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयाच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे पं.विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त  ‛संगीत के प्रणिता’ या ९ व्या दोन दिवसीय संगीत समारोहाचे आयोजन संगीत विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. अभिजात भारतीय संगीत जनमानसात रुजवण्याचं मोलाचं कार्य करणारे संगीत महर्षी
पं.विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. विष्णू नारायण भातखंडे  या विष्णुद्वयींच्या पुण्यतिथी निमित्त कृतज्ञता म्हणून प्रतिष्ठान च्या सर्व शाळांसह जिल्हाभरातील संगीत साधकांनी या महोत्सवात स्वरसुमनांजली अर्पण केली. यावेळी शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय संगीतावर आधारित गायन , वादन व नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पं.भातखंडे तथा पं.पलुस्कर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विवेकानंद प्रतिष्ठानचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.किरण सोहळे व कार्यक्रम प्रमुख गणेश देसले यांनी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सांगितीक कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व संगीत शिक्षकांनी विष्णु द्वयींना’जय जगदीश हरे ‘ हि प्रार्थना आणि  ‛संगीत के प्रणेता शत-शत तुम्हे प्रणाम’ या गीताच्या माध्यमातून स्वरभावांजली अर्पण केली. महोत्सवात पहिल्या दिवशी विवेकानंद प्रतिष्ठानच्या डॉ.आचार्य विद्यालय ब.गो.शानभाग विद्यालय,वाघ नगर प्राथमिक शाळा,काशिनाथ पलोड स्कूल, इंग्लिश मिडियम विभागांसह जुईली कलभंडे , मनोरमा ओगले,शुभदा नेवे,मयूर शहा,सारंग जेऊरकर ,राहुल कासार,नुपूर चांदोरकर ,नेहा जोशी ,अपर्णा भट या सांगितीक गुरुंच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे यांच्या भैरवी गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप झाला. दुसऱ्या दिवशी
गोविंद मोकाशी,जितेश मराठे,अनुराग जगदाळे,लक्ष्मण राजपूत,सुनील पाटील ,तेजस मराठे,शिरीष जोशी,शिवानी पाठक,रमा करजगावकर ,अर्चना चौधरी या गुरुंच्या विद्यार्थ्यांनी एकाहुन एक सरस सादरीकरण केले.जितेश मराठे यांच्या भैरवीने समारोप करण्यात आला.
प्रतिष्ठान च्या उपाध्यक्ष हेमाताई अमळकर, सचिव विनोद पाटील, सदस्य कविता दीक्षित, वैजयंती पाध्ये, रत्नाकर गोरे,वैशाली गोरे यांच्या सह मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.
वरुण नेवे,रवींद्र भोईटे यांनी आभार प्रदर्शन केले तर दर्शन गुजराती, जया साळुंखे, तुषार पुराणिक, वर्षा कुळकर्णी यांनी सुत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजना बाभुळके, स्वाती देशमुख,सुयोग गुरव,शितल सोनवणे,कल्याणी वाणी,रोहित बोरसे,भुषण गुरव,उमेश सुर्यवंशी यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम