
संत गजानन महाराज इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी..
सिंहाक्षणाधिश छत्रपतींचा चा जिवंत देखावा..
संत गजानन महाराज इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी..
सिंहाक्षणाधिश छत्रपतींचा चा जिवंत देखावा..
शेगाव
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा सादर करीत गजानन इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली
दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूलच्या भव्य प्रांगणात मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनात स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा सादर करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील वर्ग नऊच्या विद्यार्थी अनिरुद्ध राधिका नानाराव पाटील यांनी छत्रपती चा पराक्रम व तेजस्वी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवले तसेच सिंहासनावर बसल्यावर त्याच्या वेशभूषेतील आत्मविश्वास ,देहबोलि आणि रुबाबदारपणाने उपस्थित शिक्षक गण व विद्यार्थ्यांची मने जिंकली
यावेळी मावळ्यांच्या भूमिकेत गजेंद्र कैलास लोखंडे व विराज नितीन पोहरे यांनी चांगली भूमिका निभावली तसेच शिवकन्या कु. कादंबरी ज्ञानेश्वर ढमाळ या मुलींनी महाराजांची शिवगर्जना करीत सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्फुरण निर्माण केले. काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग कथन केले तसेच ” जगदंब ,जगदंब ….” या स्फूर्ती गीतावर सामूहिक नृत्य सादर करीत महाराजांच्या महाआरतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम