संत गोरोबा काकांचा आदर्शवाद आत्मसात करुन समाज उत्कर्षासाठी संघटीत व्हा -राणा दिलीपकुमार सानंदा

बातमी शेअर करा...

संत गोरोबा काकांचा आदर्शवाद आत्मसात करुन समाज उत्कर्षासाठी संघटीत व्हा -राणा दिलीपकुमार सानंदा
संत शिरोमणी गोरोबा काका भवन येथे गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

खामगांव प्रतिनिधी गोरोबा महाराज यांच्या 708 व्या पुण्यतिथीनिमित्त घाटपुरी येथील संत शिरोमणी गोरोबा काका भवन येथे विविध कार्यक्रम पार पडले. सकाळी 10 वाजता ह.भ.प.ज्योतीताई काळे यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी गोरोबा महाराजमंदिरामध्ये जावुन संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन दर्शन घेतले.याव्ोळी त्यांच्यासोबत खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे,माजी जि.प.सदस्य गजानन वाकुडकर,घाटपुरी ग्राम पंचायतचे सरपंच विष्णु कुळसुंदर,माजी सरपंच प्रकाश शेळके,संजय लाहुडकार आदींची उपस्थिती होती.याव्ोळी संत गोरोबा संस्थानच्या वतीने अध्यक्ष रामभाऊ बेंडोकार यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.
याव्ोळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, संतश्रेष्ठ गोरोबा काका हे महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायातील संत होते.ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. संत गोरोबा काका यांनी भक्तीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनेक अभंग लिहले व त्या माध्य्ामातून लिहुन समाजाला दिशा देण्याचे महत्वपुर्ण कार्य केले आहे.संत गोरोबा काकांचा आदर्शवाद आत्मसात करुन सर्व कुंभार समाज बांधवांनी संघटीत होवुन समाज उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
या पुण्यतिथी कार्यक्रमप्रसंगी कुंभार समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे समाजभुषण माजी मुख्याध्यापक रामेश्वर कापडे सर, कृषी सहाय्यक प्रकाशजी गंद्रे, समाजभुषण विनोद लाहुडकार, समाजभुषण किरणताई लंगोटे,ज्योतीताई बावस्कर आदी सन्माननीय व्यक्तींना समाजभुषण म्हणुन गौरव करुन त्यांचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. सोबतच संत गोरोबा काका भवनसाठी विविध भेट वस्तु देणाऱ्या दानदात्यांचा सुध्दा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन कैलास तायडे सर यांनी तर आभार प्रदर्शन रामेश्वर कापडे सर यांनी केले.
या कार्यक्रमाला श्री संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर समितीचे अध्यक्ष श्री राजाराम बेंडोकर, कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष श्री विनोद लाहुडकर, निनाजी बावस्कर,निनाजी मांडवेकर,दिनकर नावकार,अंबादास धोटे, गजानन सोनोने, हरिदास नावकार,संजय लाहुडकार,नारायण मुंडोकार,श्रावण मोरे, मयुर लाहुडकार, बळीराम मोरे,संदिप बावस्कर,संजय बनकर,संतोष पिंगळे,जानराव वसे,देवमन तायडे,सौ.सिमाताई संजय लाहुडकार यांच्यासह कुंभार समाज बांधव-भगिणी मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम