
संत ज्ञानेश्वर विद्यालयात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर
संत ज्ञानेश्वर विद्यालयात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर
शिबिरात सुमारे ४५० विद्यार्थी व १०० पालकांची तपासणी
जळगाव प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर श्री चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री पी. ई. तात्या पाटील रुग्णालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात सुमारे ४५० विद्यार्थी व १०० पालकांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान विविध आजारांबाबत मार्गदर्शन करून आवश्यक सल्ला देण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, नेत्रतज्ज्ञ डॉ. जयेश वाल्हे तसेच प्रशिक्षणार्थी डॉ. प्राची खलसे, भावना दातीर, हर्षदा पाटील, श्रद्धा चौधरी, फैज खान यांचे आभार मानले.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसह पालकांना आरोग्याबाबत जागरूकता मिळाली असून अशा उपक्रमांमुळे समाजात संस्कारक्षम आणि निरोगी पिढी घडण्यास हातभार लागतो, असे मत व्यक्त करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम