संत तानाजी महाराजांचा ८७ वा समाधी सोहळा; पादुकांचा विशेष दर्शन सोहळा

बातमी शेअर करा...

संत तानाजी महाराजांचा ८७ वा समाधी सोहळा; पादुकांचा विशेष दर्शन सोहळा

 

कल्याण, मुंबई: खानदेशातील दोडे गुजर समाजाचे महान संत, पूज्य सद्गुरू संत श्री तानाजी महाराज गुर्जर यांच्या ८७ व्या समाधी सोहळ्यानिमित्त त्यांच्या चरण पादुकांचा विशेष दर्शन सोहळा कल्याण, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. पावसाळ्यामुळे कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला असून, आता हा सोहळा २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता श्री सुनील चौधरी यांच्या अंबरनाथ येथील फार्म हाऊसवर होणार आहे.

संत तानाजी महाराज हे दोडे गुजर समाजातील विटनेर (खानदेश) गावचे महान संत होते. त्यांच्या परंपरेचे वंशज महंत ह.भ.प. प्रा. डॉ. श्री सुशील महाराज विटनेरकर यांनी या विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे.

या विशेष मुंबई दौऱ्यादरम्यान, संत तानाजी महाराजांच्या पालखीचे आगमन २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. या सोहळ्यात संत भेटीचा आणि चरण पादुकांचे दर्शन घेण्याचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. या कार्यक्रमाची सांगता गुलाल-कीर्तनाने होणार आहे.

या सोहळ्याचे निमंत्रक म्हणून सुनील चौधरी, पन्नालाल पाटील, जी. आर. पाटील, ए. जी. पाटील, भागवत पाटील, शिवाजी पाटील आदी काम पाहत आहेत. तसेच डॉ. विजय पाटील, अंकुश पाटील, एम. डी. पाटील, प्रशांत पाटील हे सोहळ्याचे संयोजक आहेत, तर सौ. शोभाताई पाटील या महिला प्रमुख आहेत.

दोडे गुर्जर मंडळ, ठाणे-मुंबई विभागाच्या वतीने सर्व भाविकांना आणि समाजबांधवांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम