चोपड्यात श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

श्री नरहरी महाराजांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून पालखीचे पूजन

बातमी शेअर करा...

बातमीदार l बुधवार दि. २८ फेब्रुवारी २०२४

चोपडा ;- चोपडा येथील सोनार समाज संत नरहरी फाउंडेशन यांच्यावतीने श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला .  याप्रसंगी श्री नरहरी महाराजांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून पालखीचे पूजन करण्यात आले ..

याप्रसंगी शहरातून पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. समाज बांधवांनी उत्साहात यात सहभाग घेतला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात कु.आराध्या वानखेडे, कु.अंकिता सोनार, कु.मयुरी भामरे, चि.हर्षल सोनार, यश वाखारकर, प्रसन्न जडे, साहिल सोनार,कु.जानवी विसपुते,मनुष्री रनाळकर व निकिता सोनार यांच्यासह समाजातील यशवंत व किर्तीवंत व्यक्तींचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

त्यात संदीप सोनार, प्रशांत सोनार सर, संजय बागुल सर, राकेश विसपुते सर, रत्नमाला दुसाने मॅडम व कार सेवक श्री अनिल भाऊ वानखेडे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.नक्षत्र ज्वेलर्स चे संचालक नितीन अहिरराव यांच्या वतीने कै. आबासाहेब पंढरीनाथ कृष्णा अहिरराव यांच्या स्मरणार्थ समाज रत्न व समाजभूषण पुरस्कार वितरित करण्यात आले.

यात श्रीमती सुशिलाबाई दत्तात्रय सोनार, प्रभाकर नाना सोनार व मुकुंदा भोजू शेठ दुसाने यांचा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला व मानाचा समाजभूषण पुरस्कार जेष्ठ विधीतज्ञ ॲड अशोक भिकाजी जाधव यांना देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी मोठ्या प्रमाणात सोनार समाज बंधू भगिनी उपस्थित होते .

तसेच श्रीमती प्राध्यापिका आशाताई पोतदार मॅडम यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष विलास सोनार सर, उपाध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव डॉक्टर विजय जाधव, खजिनदार रविंद्र वानखेडे तसेच श्री रवींद्र विसपुते भटू शेठ विसपुते मुकुंदा शेठ दुसाने अनिल भाऊ वानखेडे, श्याम सोनार, श्रीराम शेठ सोनार, भूषण बागुल श्री राकेश विसपुते रोहित सोनार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर विजय जाधव यांनी केले.

 

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम