
संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेतुन समृध्दीकडे जाण्याचा मुलमंत्र दिला- माजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा
धोबी समाज तर्फे संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेतुन समृध्दीकडे जाण्याचा मुलमंत्र दिला- माजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा
धोबी समाज तर्फे संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
खामगाव प्रतिनिधी
सार्वजनिक धोबी समाज महासंघ शाखा खामगावच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 149 वी जयंती रविवार दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातुन सकाळी 9 वाजता टाळ मृदुंगाच्या गोपाला-गोपाला देवकी नंदन गोपालाचा जयघोष करीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.स्थानिक सुटाळपुरा भागातील संत गाडगे महाराज मंदिरापासुन या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. ही शोभायात्रा फरशी चौक,भगतसिंग चौक, टॉवरचौक,शहर पोलीस स्टेशन समोरुन अग्रसेन चौक,महावीर भवन येथे या या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेमध्ये सोपान महाराज यांच्या रामकृष्ण संच व लासुरा येथील टाळकरी यांच्यासह धोबी समाज बांधव भगिणी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महावीर भवन येथे धोबी समाज बांधवांच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहुन संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण केले.याप्रसंगी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, कर्मयागी संत गाडगे महाराजांनी समाजातील सर्व घटकाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य खच घातले. गाडगे महाराजांनी स्वच्छतेतुन समृध्दीकडे जाण्याचा मुलमंत्र दिला. जनकल्याणाची कामे करणारे कर्मयोगी गाडगे महाराजांच्या विचारांची आज देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे असे सांगुन त्यांनी उपस्थितांना संत गाडगे महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर,माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक संभाजीराव टाले,बहुभाषिक ब्राम्हण सभेचे माजी अध्यक्ष संजुभाऊ शर्मा,सुनिल ठाकुर यांच्यासह सर्वभाषीक धोबी समाज महासंघाचे रमेश चंदेल,विनोद परदेसी, गजानन वासनकर, हेमंत परदेसी, तुषार चंदेल,रमेश परदेसी यांच्यासह धोबी समाज बांधव-भगिणी उपस्थित होते. संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम