संविधानभान : काळाची गरज या विषयावर व्याख्यान

संविधान गौरव महोत्सवाच्या निमित्त आयोजन

बातमी शेअर करा...

संविधानभान : काळाची गरज या विषयावर व्याख्यान
संविधान गौरव महोत्सवाच्या निमित्त आयोजन
जळगाव ( प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सामाजिकशास्त्रे प्रशाळा यांच्या संयुक्तविद्यमाने संविधान गौरव महोत्सवाच्या निमित्ताने संविधानभान : काळाची गरज या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

सामाजिकशास्त्र प्रशाळेत व्याख्यान कार्यक्रमास वक्ते म्हणुन डॉ.विजय घोरपडे तर मंचावर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे व रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे उपस्थित होते.या प्रसंगी डॉ.घोरपडे यांनी सांगितले की, भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले पाहिजे. आपली लोकशाही अधिक सुदृढ आणि बळकट होण्यासाठी शेवटच्या घटकांपर्यंत संविधानिक मुल्य रुजवणे गरजेचे आहे.

डॉ.लेकुरवाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून त्याचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. डॉ.नांद्रे यांनी संविधान जनजागृती विषयक आवश्यकता आपलया भाषणातून स्पष्ट केली. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास रासेयो एकक कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास दांडगे, डॉ. उमेश गोगडीया, डॉ. अभय मनसरे, श्रीशंकर यशोद, अजय महाले व तथागत सुरवाडे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन डॉ.मनोज इंगोले यांनी तर आभार डॉ. कविता पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम