सत्कार – अंबरनाथ चे नगर रचनाकार विवेक गौतम यांचा रोटरी तर्फे भव्य सत्कार

विवेक गौतम यांचा “स्वराज्य अभियंता हिरोजी इंदलकर पुरस्कार" ने राज्य शासनातर्फे सन्मान

बातमी शेअर करा...
बातमीदार | शनिवार दि 24 फेब्रुवारी 2024
अंबरनाथ चे नगर रचनाकार विवेक गौतम यांचा रोटरी तर्फे भव्य सत्कार

विवेक गौतम यांचा “स्वराज्य अभियंता हिरोजी इंदलकर पुरस्कार” ने राज्य शासनातर्फे सन्मान

अंबरनाथ – येथील नगर परिषदेचे नगर रचनाकार विवेक गौतम यांना महाराष्ट्र शासनातर्फे मानाचा “स्वराज्य अभियंता हिरोजी इंदलकर पुरस्कार” मिळाल्याने रोटरीतर्फे  रोटरी भवन येथे भव्य सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील एकूण ३९० नगर परिषदा व नगर पंचायतीपैकी अंबरनाथ नगरपंचायतीचे नगर रचनाकार विवेक गौतम यांना “स्वराज्य अभियंता हिरोजी इंदलकर पुरस्कार” मिळाला. त्यानिमित्त रोटरी तर्फे त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्कार
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी व रोटरी अध्यक्ष अमर राणे यांच्या हस्ते व सर्व सदस्य यां लच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री गौतम यांनी पुरस्काराचे श्रेय त्यांचे सहकारी अधिकारी, न. प. चे मुख्याधिकारी श्री रसाळ, कार्यालयीन स्टाफ, व मित्रपरिवार यांना दिला आहे.
हा पुरस्कार नगर विकास विभागातील सर्वोच्च पुरस्कार आहे व राज्यातील एकूण ३९० नगर परिषदा व नगर पंचायतीपैकी हा पुरस्कार घेणारी अंबरनाथ नगर परिषद ही एकमेव नगर परिषद आहे.
या प्रसंगी रोटरी तर्फे अपील पुस्तिकेचे सुध्दा प्रकाशन करण्यात आले. प्रसंगी अध्यक्ष अमर राणे, सचिव राठोड, प्रसंगी अध्यक्ष अमर राणे, सचिव विक्रम राठोड,
शाळा समिती चेअरमन गुणवंत खेरोदिया, चार्टड अकाउंटेंट किरण मूठे, शरद दलाल अनिल खोड़, डॉ गणेश राठौड़, मयूर वीसारीया, प्रकाश बाफ़ना व इतर सन्माननीय सदस्य गण उपस्थित होते.

हे ही वाचा 👇

आदिवासी कोळी जमातीच्या महाआंदोलनास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम