सत्रासेन आश्रमशाळेत संविधान दिवसानिमित्त जनजागृतीपर उपक्रमांचे भव्य आयोजन

बातमी शेअर करा...

सत्रासेन आश्रमशाळेत संविधान दिवसानिमित्त जनजागृतीपर उपक्रमांचे भव्य आयोजन

सत्रासेन (ता. चोपडा) : अनुदानित आश्रमशाळा सत्रासेन येथे 26 नोव्हेंबर संविधान दिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक, संविधानाविषयी जागरूकता, हक्क-कर्तव्यांची ओळख आणि राष्ट्रभावना दृढ करण्यासाठी दिवसभर विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि देशप्रेमाच्या वातावरणात पार पडला.

सकाळी कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या माध्यमिक विभाग प्रमुख सौ. वंदना भादले आणि पदवीधर प्राथमिक शिक्षिका सौ. दिपमाला भादले यांच्या हस्ते संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधान उद्देशिका आणि पुस्तिकेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक जगदिश महाजन यांच्यासह प्राथमिक शिक्षक विकास पाटील, सरोजिनी चौधरी, सुधाकर महाजन, अजय पावरा, उदय वानखेडे, विकास कोळी, पवन पावरा, अनिल राणे, मनोज साळुंखे, कल्पना पाटील, मनिषा जाधव, वैशाली अजगे, शितल पाटील, माध्यमिक शिक्षक प्रकाश महाजन, कैलास महाजन, संजय शिरसाळे, अधिक भादले, तसेच उच्च माध्यमिक विभागातील भालचंद्र पवार, मनोज पाटील, योगेश पाटील, गजानन पाटील, नरेंद्र देसले, झुलाल करंकाळ, परमवीर भादले, दिलीप बाविस्कर उपस्थित होते. वसतिगृहातील कर्मचारी रामलाल अवाया, हिरालाल अवाया, पन्नालाल सोनवणे, विजय सैदाणे, विनोद महाजन, पंकज नहाले, आक्काबाई भादले, सुशिला पावरा, अनिल भादले, संदीप कोळी यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.

यानंतर संविधान दिनानिमित्त गावातून भव्य रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात विविध आदिवासी क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रीय नेत्यांचे जीवनपरिचय दर्शवणारे फलक घेत मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला. या मिरवणुकीतून राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्यांचे संवर्धन, संविधानाचा इतिहास, मानवी हक्क, पर्यावरण संवर्धन व सामाजिक जागृती यांचे संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आले.

शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर, वाचन, सामान्य ज्ञान व रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली सर्जनशीलता, प्रतिभा व ज्ञान प्रभावीपणे प्रदर्शित केले. विद्यार्थ्यांच्या आकर्षक रांगोळ्या, देखणे हस्ताक्षर व ज्ञानस्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे कार्यक्रम अधिकच उजळून निघाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगेश पाटील यांनी उत्तमपणे पार पाडले. भालचंद्र पवार व उदय वानखेडे यांनी संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत तत्त्वे, न्याय–स्वातंत्र्य–समता–बंधुता यांचा संदेश तसेच नागरिकांच्या कर्तव्यांची प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. सुधाकर महाजन व अजय पावरा यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. शेवटी सुधाकर महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.

विविध स्पर्धांतील विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष रविंद्र भादले, उपाध्यक्ष धनंजय भादले आणि सचिव ज्ञानेश्वर भादले यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह कार्यक्रमाच्या यशाचे प्रमाण ठरले.

संविधान दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, शिस्त, लोकशाही मूल्यांची जाणीव व जागरूक नागरिकत्वाचे संस्कार दृढपणे रुजविण्यात आल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम