
सदभावना सेवा समिती बुलडाणा द्वारा आयोजित भव्य संगितमय शिवपुराण कथा- पुष्प चवथे…
सदभावना सेवा समिती बुलडाणा द्वारा आयोजित भव्य संगितमय शिवपुराण कथा- पुष्प चवथे…
षड्रिपुच्या मोहात अडकलो तर मुक्त होणार नाही – बाल संत दीपशरणजी महाराज
बुलडाणा :- मनुष्य काम, क्रोध, मोह, मद, मत्सर इत्यादीमध्ये जर अडकला असेल तर तो आणखी अडकत जातो. मोहाच्या दोरीला खुंटीशी बांधुन ठेवले नावाडी कितीही वल्ली हलवत राहीला आणि खुंटीचा दोर सोडला नाही तर ज्याप्रमाणे नाव प्रयत्न करुनही पुढे जाणार नाही तसेच षड्रिपुच्या मोहात अडकलो तर मुक्ती होणार नाही असे प्रतिपादन बालसंत दिपशरणजी महाराज यांनी शिवमहापुराण कथेचे चवथे पुष्प गुंफतांना केले. सद्भावना सेवा समितीद्वारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज वारकरी भवन येथे ४ ते १० ऑगस्ट दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत कथा आयोजित केली आहे. कथा प्रारंभहोण्यापुर्वी संतोष तुपकर, पंजाबराव मासोदकर, चरणदास अनेरकर यांनी माल्यार्पण केले. आजचा दिवस अग्रवाल समाज महिला मंडळाचा होता. रुद्राभिषेक तयारी, व्यासपीठ तयारी, आरती सजावट करून सर्वांनी व्यासपीठावर हार घालून आरती केली. यामध्ये श्रीमती सरला अग्रवाल, कुसुम अग्रवाल, सारिका चिरानिया, किरण चिरानिया, ज्योती भडेच, प्रमिला अग्रवाल, अस्मिता अग्रवाल, सरोज अग्रवाल, राधिका अग्रवाल, प्रिती अग्रवाल, दिपीका अग्रवाल, मोनिका चिरानिया यांनी सहभाग घेतला सायंकाळी आरतीमध्ये उमेश मुंदडा, मधुकर गायके, नितीन तापडीया, नितीन जयस्वाल, सौ. मंदा संतोष तूपकर, श्रीमती सरला अग्रवाल यांनी व्यासपीठावर आरती केली. दि. १० ऑगस्टला रविवारी होम हवन आणि २ वाजता महाप्रसाद होईल. आज शिवपार्वती विवाह निमित्त झाँकी सादर केली. चंद्रशेखर माळी मामा यांनी या निमित्त २५ किलो बुंदी दिली. सौ. सुनिता वाघमारे, यादव वाघमारे भुसावळ येथुन आलेले रेल्वे कर्मचाऱ्यांनी महाराजांचे पुजन व हार घालून आरती केली. रुद्राभिषेक करणाऱ्यामध्ये सौ. किरण जुगलकिशोर चिरानिया, सौ. रेखा प्रकाशचंद्र पाठक, सौ. पुजा मयुर जैस्वाल, सौ. ज्योती कैलाश भडेच, सौ. माधवी आनंद गिदोडीया, सौ. सपना पंकज अग्रवाल, सौ. सुनिता यादव वाघमारे यांचा समावेश होता सर्वांनी ज्योतीर्लिंगा समोर आरती केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाशचंद्र पाठक यांनी केले. सिंधी व पंजाबी समाज महिला मंडळाने व्यवस्थापन केले, माहेश्वरी समाजाने प्रसाद वितरण केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम