सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी

बातमी शेअर करा...

सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

चोपडा – महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय अनुदानित आश्रमशाळांतील खेळाडूंसाठी आयोजित क्रीडा स्पर्धा दि. १६ ते १८ डिसेंबर दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये चोपडा तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा, सनपुले येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.

१७ वर्षांखालील वयोगटात रिले क्रीडा प्रकारात ४×१०० मीटर व ४×४०० मीटर, तसेच १९ वर्षांखालील वयोगटातील ४×४०० मीटर रिले स्पर्धेत सनपुले आश्रमशाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दोन्ही संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

वैयक्तिक स्पर्धांमध्येही खेळाडूंनी आपली छाप उमटवली. धावण्याच्या स्पर्धेत सयाराम मन्साराम बारेला याने २०० व ४०० मीटर या दोन्ही प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. तर थाळीफेक क्रीडा प्रकारात अनिल बद्री भीलाला याने द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरावर निवड मिळवली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रकल्पाधिकारी अरुण पवार, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जगन्नाथ पाटील, सचिव गणेश भागवत पाटील, सहाय्यक प्रकल्पाधिकारी प्रशांत माहुरे, पवन पाटील, संदीप पाटील, कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे, प्राथमिक मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक नितीन पाटील तसेच क्रीडा शिक्षक ईश्वर पावरा, भूपेश पाटील, अश्विनी पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम