शाकंभरी नवरात्रोत्सवनिमत्त श्री गोरक्षनाथ मंदिरात हवनयुक्त सप्तशती पाठ
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रतर्फे आयोजन
शाकंभरी नवरात्रोत्सवनिमत्त श्री गोरक्षनाथ मंदिरात हवनयुक्त सप्तशती पाठ
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रतर्फे आयोजन
जळगांव I प्रतिनिधी
शाकंभरी नवरात्रउत्सवानिमित्त शहरातील वासुदेव जोशी कॉलनी येथील श्री गुरू गोरक्षनाथ मंदिराच्या आवारात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या वतीने दिनांक 7 जानेवारी पासुन ते 13 जानेवारी पर्यंत दुर्गा सप्तशती पाठ चे आयोजन केलेले आहे
या नवरात्रत्सवात वासुदेव जोशी महिला मंडळातील महिलांनी मोठ्या संख्येने दुर्गा सप्तशती पठनाथ सहभाग नोंदविला असुन
रोज सकाळी व संध्याकाळी दुर्गा सप्तशती पठन सामूहिक रित्ये पुजन- पठण, पुजा अर्चना मंदिरात होते.
तसेंच येणाऱ्या 13 जानेवारी सोमवार रोजी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी 21 जोडप्यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता हवनयुक्त सप्तशती पाठाचे आयोजन केलेले आहे सोबत 64 भाज्यांचा नैवेद्य देवीला अर्पण करणार असुन त्या सोबतच कुमारिका पूजन हि होणार आहे . तरी या सेवेचा जास्तीत जास्त सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र आणि श्री गुरू गोरक्षनाथ मंदिर, जोशी कॉलनी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे .
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम