
सब जुनियर व ज्युनियर हॉकी मुली निवड चाचणीला उस्फूर्त प्रतिसाद
सब ज्युनिअर मधून २२ मुलींची तर जुनियर मधून २३ मुलींची निवड
सब जुनियर व ज्युनियर हॉकी मुली निवड चाचणीला उस्फूर्त प्रतिसाद
सब ज्युनिअर मधून २२ मुलींची तर जुनियर मधून २३ मुलींची निवड
जळगाव प्रतिनिधी
पुणे येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे १ ते ७ मार्च दरम्यान खेलो इंडिया मार्फत हॉकी महाराष्ट्र आयोजित सब ज्युनियर व ज्युनियर मुलींच्या हॉकी स्पर्धेसाठी, हॉकी जळगाव तर्फे जळगाव जिल्हा निवड चाचणी स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे घेण्यात आली असून यात सब ज्युनिअर मधून २२ मुलींची तर जुनियर मधून २३ मुलींची निवड करण्यात आली असून या मुलींचे प्रशिक्षण शिबिर जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
२६ फेब्रुवारी रोजी अंतिम निवड यादी घोषित करण्यात येणार असल्याचे हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख व हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
निवड चाचणी यांचा होता सहभाग
निवड चाचणीसाठी विद्या फाउंडेशन जळगाव, डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालय जळगाव व भुसावळ येथील डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथील मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
*निवड समिती सदस्य*
हॉकी जळगाव तर्फे राष्ट्रीय खेळाडू तथा एन आय एस मार्गदर्शिका हिमाली बोरोले, वर्षा सोनवणे व इमरान बिस्मिल्ला यांनी निवड समिती सदस्य म्हणून कार्य केले व अंतिम संघ निवडून ते या संघाला पुणे येथे घेऊन जाणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम