
समर्थ ज्वेलर्सचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
समर्थ ज्वेलर्सचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव – शहरातील दूध फेडरेशन रोडवरील मिथीला अपार्टमेंट, शॉप क्रमांक 21, एच. पी. गॅस गोडाऊनसमोर, समर्थ ज्वेलर्स या नवीन ज्वेलरी शोरूमचे भव्य उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरण लाभले.
समर्थ ज्वेलर्सचे मालक विनायक पाटील वढोदेकर यांच्या नव्या शोरूमचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंग राजे पाटील यांच्या शुभहस्ते झाले.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर श्री. विनायक पाटील यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, “आपल्या विश्वास आणि आशीर्वादामुळेच हा नवा प्रवास शक्य झाला आहे. आम्ही ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह दागिने पुरविण्यास कटिबद्ध आहोत.”

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम