समाजकार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघठन अधिक बळकट होईल. – माजी आ.राणा दिलीपकुमार सानंदा

बातमी शेअर करा...

समाजकार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघठन अधिक बळकट होईल. – माजी आ.राणा दिलीपकुमार सानंदा
उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  51 रक्तदात्यांचा सानंदांच्या हस्ते सत्कार  

खामगाव ः- अस्तीत्व चॅरीट्रेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.आकाश इंगळे व त्यांचे सर्व सहकारी हे जात-पात-धर्म-पंथ व पक्ष संघटनेच्या बंधन बेडया तोडून नागरीकांच्या सुख,दुखामध्ये सदैव समरस होवुन संघटनेच्या माध्यमातून अहोरात्र मेहनत घेवुन विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवशी अस्तित्व चॅरीट्रेबल ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतल्ाा आहे.समाजकार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघठन अधिक बळकट होईल व भविष्यात अश्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष संघटनेला निश्चीतच फायदा होईल असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.दि.22 जुलै 2025 रोजी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील भालेगाव बाजार येथे शालेय विद्यार्थ्यांना फळवाटप व 51 रक्तदात्यांचा सत्कार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा पार पडला त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
यावेळी मंचावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवा जिल्हाअध्यक्ष सुरज बेलोकार,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, उपसभापती संघपाल जाधव,सामाजिक रिपब्लीकन संघटनेचे प्रकाश दांडगे, मनोज वानखडे, विजय काटोले, खामगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीचे लायसन कमिटी सभापती विलाससिंग इंगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रोहित राजपुत,तुषार चंदेल,केशव कापले,बिलाल खान पठान,गणेशआप्पा इंगळे,एजाज देशमुख,सुपडु शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, अस्तित्व फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानाच्या विधायक कार्यामध्ये नेहमी पुढाकार घेवुन रक्तदान करुन खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे कार्य केले आहे असे सांगुन त्यांनी रक्तदात्यांचे मनापासुन अभिनंदन केले.
सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी छत्रपती शाहु महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मौलाना अबुल कलाम आझाद,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या थोर महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला.उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भालेगाव बाजार येथील मराठी पुर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फळ व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी अस्तित्व चॅरीट्रेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.आकाश इंगळे यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.   आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी रक्तदानाच्या विधायक कार्यात सहभाग घेणाऱ्या अस्तित्व चॅरीट्रेबल ट्रस्टच्या 51 कार्यकर्त्यांचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यकर्त्यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या  नेतृत्वावर विश्वास ठेवुन उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश घेतला.पक्ष प्रवेशकर्त्यांचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिरंगा दुपटट्ा घालुन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आकर्षक छत्री देवुन कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षामध्ये स्वागत करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, अजितदादा पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,आम्ही सर्व अजित पर्व,एकच वादा-अजित दादा अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंजाबराव देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन बिलाल खान पठान यांनी केले.या कार्यक्रमाला सनीभाऊ ससाने,बंडुभाऊ इंगळे,श्याम गायगोळ,महारु राठोड, पुरुषोत्तम भोसले,हरिभाऊ पवार,प्रमोद राणा,शुभम मिश्रा, अक्षय इंगळे,लक्ष्मण घोरपडे,फीरोज खान आरीफ खान,शरीफ शाह, अंबादास नाईक, शेख करीम, मुंतजीर खान, खंडु इंगळे,दिपक इंगळे,गौतम इंगळे, बळीराम सावरकर,सोपान इंगळे, किशोर प्रधान,राहुल इंगळे,गणेश इंगळे यांच्यासह भालेगाव बाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व अस्तीत्व चॅरीट्रेबल ट्रस्टचे पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम