
समाजवादी पार्टीत असंख्य तरुणांचा उत्स्फूर्त प्रवेश ; पक्षात नवचैतन्याचा संचार!
समाजवादी पार्टीत असंख्य तरुणांचा उत्स्फूर्त प्रवेश ; पक्षात नवचैतन्याचा संचार!
जामनेर /प्रतिनिधी –
जामनेर तालुक्यात समाजवादी पार्टीच्या विचारसरणीने प्रेरित होऊन असंख्य तरुणांनी पक्षात उत्स्फूर्त प्रवेश केला. सामाजिक न्याय, समानता आणि विकासाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत या तरुणांनी समाजवादी पक्षाचे झेंडे हातात घेत पक्षविस्ताराला नवे बळ दिले आहे.
या प्रसंगी पक्षाचे जळगाव निरीक्षक गुड्डू काकर, धुळे महानगर अध्यक्ष रईस बागवान, प्रदेश सचिव अफजल खान, कोअर कमेटि सदस्य रीजवान जहागीरदार, हुसैन बावा, रईस कुरेशी, जामनेर तालुकाध्यक्ष शेख रऊफ, यांच्या उपस्थितीत तरुणांनी पक्षनिष्ठा स्वीकारली. त्यांनी सांगितले की, “तरुण शक्ती हीच खरी परिवर्तनाची ताकद आहे, आणि समाजवादी विचारधारा हाच समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देणारा मार्ग आहे.”
पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. तालुक्यातील तसेच गावागावातून आलेल्या शेकडो युवकांनी पक्षाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. समाजातील दुर्बल घटकांसाठी लढणाऱ्या या पक्षात सहभागी होत त्यांनी सामाजिक बदलाचे नवे वारे आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाला विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे समाजवादी पार्टीत नवे ऊर्जासंचार झाले असून आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम