समाजातील सर्व घटाकंसाठी ब्रह्माकुमारीज्चे कार्य उल्लेखनिय – ना. गुलाबराव पाटील

सावखेडास्थित ब्रह्माकुमारीज् दिव्य प्रकाश सरोवर राजयोग ध्यान आणि प्रशिक्षण

बातमी शेअर करा...

समाजातील सर्व घटाकंसाठी ब्रह्माकुमारीज्चे कार्य उल्लेखनिय – ना. गुलाबराव पाटील
सावखेडास्थित ब्रह्माकुमारीज् दिव्य प्रकाश सरोवर राजयोग ध्यान आणि प्रशिक्षण
जळगाव प्रतिनिधी

जागतिक स्तरावरील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे समाजातील सर्वच घटकांसाठी होत असलेले कार्य उल्लेखनिय असून त्यायोगे हजारो लोकांचे झालेले जीवन परिवर्तन अभिनंदनीय आहे. असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

सावखेडास्थित ब्रह्माकुमारीज् दिव्य प्रकाश सरोवर राजयोग ध्यान आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा हृदय सत्कार ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सत्कार प्रसंगी बोलतांना त्यांनी ब्रह्माकुमारीज्च्या माध्यमातून मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीचे दिव्य प्रकाश सरोवर द्वारे होत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि राजयोगाच्या माध्यमातून हजारो व्यक्ति अवगुण मुक्त, व्यसनमुक्त, विकारमुक्त झाल्याने पारिवारीक शांती, सामाजिक शांती आणि वैश्विक शांती येत असल्याचे सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर मिनाक्षीदीदी, नितादीदी, विष्णुभाऊ भंगाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख, धीरज सोनी हे उपस्थित होते. मंचसंचलन ब्रह्माकुमारी राजदीदी यांनी तर आभार रवी पाटील, वाघळुद यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम