
समाजाने केलेला सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही – महंत हभप प्रा. डॉ.सुशील जी. महाराज
समाजाने केलेला सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही – महंत हभप प्रा. डॉ.सुशील जी. महाराज
जळगाव :– जळगांवला मी श्रीमद भागवत कथे साठी मी दुसऱ्यांदा आलो , आपुलकीची भावना जाणणारे व अध्यात्म जोपासणारे भाविक येथे मोठ्या संख्येने आहेत याचा मला आनंद वाटला . महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या भूमीत आपण जन्माला आलो हेच मोठे भाग्य आहे, मानवाने संतांच्या आठवणीतून धार्मिकता जोपासावी असे सांगून , आज समाजाने केलेला सन्मान खूप मोठा आहे असे ह भ प महंत प्रा डॉ. सुशील जी महाराज ( विटनेर कर) यांनी वीर गुर्जर सेना तर्फे आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना सांगितले.
जळगाव येथील खोटे नगर पाण्याच्या टाकी जवळ सौ सुनंदा ताई पाटील यांच्या 65 व्या अभिष्टचिंतन च्या निमित्ताने आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमास महंत ह भ प प्रा डॉ सुशील जी महाराज पाटील जळगाव येथे आलेले आहेत, आज सकाळी वीर गुजर सेना कार्यालयात वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष पत्रकार राजेंद्र पाटील (गाढोदे) व मान्यवरांतर्फे त्यांच्या सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार मंगल बी पाटील यांनी केले.
यावेळी रेल तालुका धरणगाव येथील श्रीकांत पाटील यांची वीर गुर्जर सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाल्याबद्दल या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात दादा वाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲड. आर एन पाटील, प्रा. राजेंद्र सांगळे, पत्रकार हेमंत पाटील, निलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास ह भ प कल्पेश महाराज, ह भ प गौरव महाराज, ह भ प शुभम महाराज, संजय भैय्या, एन टी पाटील, रामराव पाटील, एस बी चौधरी, नितीन चौधरी, यशवंत पाटील, बापू पाटील, राजेंद्र सुतार, प्रमिला ताई पाटील, हर्षवर्धन पाटील, रेवती ताई पाटील, शरद देसले, वैशाली उमेश पाटील, आरोही पाटील, मोहन नारखेडे, किशोर शिंपी, प्रांजल पाटील यांच्यासह असंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम