समाज एकतेचे नवे पर्व : VGCL आणि GPL चा ऐतिहासिक मिलाफ

बातमी शेअर करा...

समाज एकतेचे नवे पर्व : VGCL आणि GPL चा ऐतिहासिक मिलाफ

चोपडा-जळगाव | समाजातील बंधुभाव आणि ऐक्याचा नवा अध्याय आजपासून सुरू झाला आहे. वीर गुर्जर क्रिकेट लीग (VGCL, चोपडा) आणि गुर्जर प्रीमियर लीग (GPL, जळगाव) यांच्या आयोजकांनी परस्परांतील जुने मतभेद विसरून एकत्र येत ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

मागील काही काळात निर्माण झालेली भावनिक व मानसिक दरी भरून काढण्याचे शिवधनुष्य दोन्ही संघटनांच्या नेतृत्वाने उचलले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज समाजाच्या एकजुटीचा विजय साकार झाला. हा केवळ क्रिकेटचा नाही, तर परस्पर विश्वास आणि ऐक्याचा उत्सव ठरला आहे.

दोन्ही लीगचे आयोजक मंडळ आणि समाज बांधवांनी हे स्पष्ट केले की, VGCL व GPL आपले वेगवेगळे फॉरमॅट कायम ठेवून क्रिकेटप्रेमींना एक आगळावेगळा अनुभव देतील. मात्र, समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र राहण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आगामी काळात सामाजिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा किंवा इतर कोणतेही उपक्रम असोत – सर्वांनी एकत्र येऊन यशस्वी करायचे ठरले आहे.

या प्रेरणादायी कार्यासाठी समाजाच्या वतीने श्री. नवलसिंगराजे पाटील, VGCL आयोजक मंडळ (चोपडा) आणि GPL आयोजक मंडळ (जळगाव) यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या पुढाकारामुळे क्रिकेटच्या मैदानावरून समाज एकतेचा नवा दीप प्रज्वलित झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम