
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त वीर गुर्जर सेनेतर्फे आज कार्यक्रमाचे आयोजन
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त वीर गुर्जर सेनेतर्फे आज कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी : लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रांतीगृहात प्रतिमा पूजन व स्वागत नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंह राजे पाटील, वीर गुर्जर सेना राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, सचिव मंगल बी. पाटील, उपाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र पाटील, पत्रकार वसंतराव पाटील, सहसचिव विद्या ताई पाटील, प्रदेशाध्यक्ष किरण पाटील, प्रदेश महिला मंडळ अध्यक्षा शोभा ताई पाटील तसेच प्रदेश युवा सेना अध्यक्ष निखिल चौधरी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व समाजबंधूंना वीर गुर्जर सेनेतर्फे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम