सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का !
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का !
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे
बीड I वृत्तसंस्था
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मोक्का लावण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे सुतोवाच काही दिवासंपूर्वीच केले होते. संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर या कायद्याअंतर्गत आता कारवाई होणार आहे. आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तर हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणेलाही आरोपी करण्यात आले आहे.
९ डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात येतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.
सरकारी वकिलांनीही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाने समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. स्थानिक पातळीवर सरपंचांसारख्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांमुळे ग्रामपंचायत व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होत आहे. या घटनेने समाजातील तणाव वाढला असून, सरकारने या प्रकरणावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.
हेही वाचा 👇🏻
गिरणा नदी पुलावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम