
सराफ गल्लीत घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास
अमळनेर येथील घटना
अमळनेर | प्रतिनिधी
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शहरातील सराफ बाजारात गुरुवारी (२२ मे) उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेहान सादिक बागवान (वय १९) रा. सराफ गल्ली, अमळनेर परिवारासह राहतात , २१ ते २२ मे दरम्यान त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि रोख ७० हजार रुपये चोरून नेले.
चोरी झाल्याचे लक्षात येतात रेहान बागवान यांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम