सर्जनशीलअध्ययन साहित्य निपुण भारत मोहिमेला गती देणारे – सीईओ मिनल करनवाल

बातमी शेअर करा...

सर्जनशीलअध्ययन साहित्य निपुण भारत मोहिमेला गती देणारे – सीईओ मिनल करनवाल

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून निपुण भारत अभियानांतर्गत सर्जनशील अध्ययन साहित्य निर्मिती स्पर्धा – 3 उत्साहात पार पडली. शालेय शिक्षण अधिक परिणामकारक, आकर्षक व आनंददायी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

या स्पर्धेचे उद्घाटन सीईओ मिनल करनवाल यांच्या हस्ते जळगाव येथील महिला अध्यापिका विद्यालयात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, शिक्षणाधिकारी सचिन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत चार्ट्स, मॉडेल्स, फ्लॅशकार्ड्स, खेळांद्वारे शिकवणी साधने, मल्टिमीडिया सादरीकरणे अशा विविध पद्धतीने अभ्यासक्रमाशी संबंधित अध्ययन साहित्य सादर करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व शिक्षकांच्या नाविन्यपूर्णतेला योग्य व्यासपीठ मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी स्पर्धेत निवडलेले उत्कृष्ट साहित्य जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती दिली. यामुळे शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण व कौशल्याधिष्ठित होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांनी पाठांतराऐवजी समजून शिकले पाहिजे, यावर भर देत सांगितले की शिक्षक-विद्यार्थी मिळून तयार केलेले अध्ययन साहित्य निपुण भारत मोहिमेला गती देणारे ठरेल.

स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील 38 शिक्षकांनी सहभाग नोंदविला. परीक्षकांनी स्टॉलला भेट देऊन साहित्याचे परीक्षण केले. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आले :
• प्रथम क्रमांक – सुनील बडगुजर
• द्वितीय क्रमांक – सीमा पाटील
• तृतीय क्रमांक – अश्विनी तायडे
• उत्तेजनार्थ – छाया पाटील, विनोद नाईकडा, फौजिया खान

परीक्षक म्हणून डॉ. जगन्नाथ दरंदले, प्रणिता झांबरे व लीना महाजन यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी मानले.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना परिणामकारक अध्ययनाची नवी दारे खुली झाली असून शिक्षकांच्या सर्जनशीलतेला प्रेरणा मिळाली, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम