
सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू
पाचोरा तालुक्यातील वेरुळी येथील घटना
पाचोरा प्रतिनिधी
शेतात काम करीत असताना शेतकऱ्याला सॅप चावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाचोरा तालुक्यातील वेरूळी बुद्रुक येथे उघडकीस आली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पितांबर त्रंबक पाटील (वय – ५८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
पितांबर त्रंबक पाटील हे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतात काम करत असताना त्यांना काहीतरी चावल्यासारखे जाणवल्याने तात्काळ ते घरी आले असता त्यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचारापुर्वीच पितांबर पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत शांत व कष्टकरी पितांबर पाटील यांच्या अकस्मात मृत्यूने वेरूळीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पसरली आहे. त्यांचेवर वेरूळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम