सर्पदंशाने १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू

बातमी शेअर करा...

सर्पदंशाने १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू

चोपडा प्रतिनिधी – चोपडा तालुक्यातील मालापूर येथील शेतमजुराच्या कुटुंबातील १३ वर्षीय बाईसी शंकर पावरा हिला राहत्या शेतातील घरात सर्पदंश झाला. उपचारादरम्यान जळगाव येथे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रविवार, ८ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास बाईसी हिला पायाला सापाने चावा घेतला. तिला तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्यामुळे सोमवारी ९ जून रोजी तिला पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना मंगळवार, १० जून रोजी सकाळी ११.१५ वाजता तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे पावरा कुटुंबासह संपूर्ण मालापूर गावावर शोककळा पसरली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम