
सर्पदंश झाल्याने पाचोरा तालुक्यातील तरुणाचा मृत्यू
सर्पदंश झाल्याने पाचोरा तालुक्यातील तरुणाचा मृत्यू
पाचोरा: तालुक्यातील वेरुळी खुर्द येथील रहिवासी प्रकाश शिवाजी पाटील (वय ३०) यांचा शेतात फवारणी करताना सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सापाने चावा घेतल्याचे त्यांच्या लक्षात न आल्याने ही घटना घडली.
प्रकाश पाटील आपल्या शेतात कपाशीवर फवारणी करत असताना त्यांना सर्पदंश झाला. त्यांना चक्कर येऊन ते शेतात कोसळले. तातडीने त्यांना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संतोष राजपूत पुढील तपास करत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम