सर्पमित्राने दिले विषारी नागाला जीवनदान
सापाला न मारल्याबद्दल सर्पमित्राने गावकऱ्यांचे मानले आभार
सर्पमित्राने दिले विषारी नागाला जीवनदान
सापाला न मारल्याबद्दल सर्पमित्राने गावकऱ्यांचे मानले आभार
पारोळा l प्रतिनिधी
येथे शनीमंदिरजवळ गुलाब तुकाराम पाटील यांना साप आढळून आला. साप पाहून त्यांनी सापाला न मारता, सापाला पकडण्यासाठी पारोळ्यात कार्यरत असलेल्या
जीवरक्षा चॅरिटेबल संस्था यांच्याशी संपर्क केला. या संस्थेत कार्य करत असलेले सर्पमित्र भूषण पाटील व प्रविण जगताप यांनी विलंब न करता सापाला सुरक्षित पकडण्यासाठी गेले असता.
तेथे जाऊन त्यांनी सापाची पाहणी केल्यास विषारी जातीचा साप असल्याचे आढळून आला. त्यांनी सापाला सुरक्षित पकडून सापाची व्यवस्थित पाहणी केली.
सर्पमित्र यांनी गावकऱ्यांना सापाबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांच्या मनातील सापाबद्दलची भीती दूर केली व नागरिकांना जागृत केले.
https://www.facebook.com/share/p/R2RkrUHgMML7kkTE/?mibextid=qi2Omg
सापाला न मारल्याबद्दल गावकऱ्यांचे जीवरक्षक चॅरिटेबल संस्था तर्फे आभार मानले.
वनपाल गायकवाड मॅडम, वनरक्षक सुवर्णा कुंभारे यांच्या मार्गदर्शनात सापाला जंगलात सुरक्षित सोडून जीवनदान दिले.
हे ही वाचा👇
माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते 67 प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम