
सर्वसामान्य जनतेला मदत करणाऱ्या व्यक्तीला साथ द्या – ॲड रविंद्र पाटील
सर्वसामान्यां जनतेला मदत करणाऱ्या व्यक्तीला साथ द्या – ॲड रविंद्र पाटील
वरणगाव शहरातील सर्व सामान्य जनतेच्या सुखा दुःखात नेहमी सहभागी होऊन त्यांच्या अडअडचणीची सोडवणुक करून खंबरीपणे वरणगाव कराच्या पाठीशी उभे राहणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रस (श प ) गटाचे उमेदवार राजेंद्र चौधरी यांना जनतेने जास्तीत जास्त मतदान देऊन निवडून द्यावे असे आवाहन माजी जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्र भैया पाटील यांनी केले आहे ते अक्सानगर मधील सभेत बोलत होते
नगर परिषद निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्या नंतर प्रत्येक राजकिय पक्ष आरोपप्रत्यारोप करताना दिसून येत दिसुन येत आहे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (श प ) गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी व नगरसेवक पदाचे उमेदवाराच्या प्राचारार्थ सभेत ॲड रविंद्र भैया पाटील यांनी विरोधाकांचा समाचार घेत गेल्या चार दशकांपासून एकहाती सत्ता आहे शहराचा विकास करू शकले नाही दिल्ली ते गल्ली पर्यंत सत्ता आहे आणखी किती वर्ष सत्ता पाहिजे विकासासाठी सत्ता मागता याचा अर्थ शहराचा विकास झाला नसल्याची कबुली स्व:ता जाहीर सभेतून देत आहे मात्र जनता सुज्ञ आहे अशा भुलथापांना वारंवार बळी न पडता सर्व सामान्य घरातून आलेल्या दुरदुष्टी असलेल्या , तुम्ही मदतीची हाक द्या ओ तयार आहे असे व्यक्तीमत्व असलेल्या राजेंद्र चौधरी यांच्या सह राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचे जाहीर आवाहन त्याने सभेत केले
तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी यांनी नागरिकांना मुलभूत सुविधा तुम्ही देऊ शकत नसाल तर हे तुमचं अपयश आहे लोकांसमोर भावनिक खेळ खेळायचा ही नौटंकी लोक जाणुन आहेत कामे केली असती तर रडायची गरज पडली नसती. आमचे विरोधाक पैशाची भाषा करत आहे मात्र वरणगावकर जनता सुज्ञ आहे अशा कोणत्याही भुलथापाना बळी न पडता सर्व सामान्यांच्या सुखा दुःखात सहभागी होणाऱ्या तसेच खऱ्या अर्थाने शहराचा विकास करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे जनता जर्नाधन उभी राहील यांत शंका नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले
यावेळी मंचावर रमेश पाटील , दिलीप खोडपे सर , विश्वजीत पाटील , राहुल जोहरे, दिपक मराठे , पप्पू जकतदार , हाजी आसीक अली , सुनिल भोई , प्रतिभा तावडे , झांबरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम