सहकारी संस्थांशी संबंधीत लोकशाही दिन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक सभागृहात 1 डिसेंबर रोजी होणार

बातमी शेअर करा...

सहकारी संस्थांशी संबंधीत लोकशाही दिन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक सभागृहात 1 डिसेंबर रोजी होणार

जळगाव जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाचा लोकशाही दिन व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या लोकशाही दिनी अल्पबचत भवन येथे एकाच ठिकाणी होत असल्याने नागरिकांची वाढती गर्दी आणि अल्पबचत सभागृहातील अपुरी बसण्याची व्यवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाचा लोकशाही दिनाचे स्थळ बदलण्याबाबत निर्देश दिले आहेत.

यानुसार नागरिकांना सूचित करण्यात येते की, दिनांक १ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता होणारा लोकशाही दिन व यापुढे होणारे सर्व सहकारी संस्थांच्या संबंधीत (स्वतंत्र) जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशिक्षण सभागृह, गणेश कॉलनी शाखा, जळगाव याठिकाणीच आयोजित केले जातील.

नागरिकांची अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी सहकारी संस्थांच्या संबंधीत लोकशाही दिनाचे स्थळ बदलण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली असून सर्व संबंधितांना याची नोंद घ्यावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम