
सहकार पुरस्कार 2023-24 : सहकारी संस्थांसाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
सहकार पुरस्कार 2023-24 : सहकारी संस्थांसाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
जळगाव, दि. १ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांचा सन्मान करण्यासाठी शासनातर्फे “सहकार पुरस्कार 2023-24” वितरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार कालमर्यादेत बदल करण्यात आले आहेत.
सहकार पुरस्कारासाठीच्या प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीत २ जुलै २०२५ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
या कालावधीत जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी आपापल्या मुख्यालयाच्या तालुक्यातील उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविताना शासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धती व निकषांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांनी त्यांच्याकडील आर्थिक स्थिती, सामाजिक उपक्रम, सभासद विकास, पारदर्शकता, प्रशासनिक कार्यक्षमता इत्यादी बाबींचा तपशील प्रस्तावामध्ये सादर करावा लागणार आहे.
तरी जिल्हयातील सर्व सहकारी संस्थांनी १८ ऑगस्ट २०२५ या कालावधी पर्यंत प्रस्ताव तयार करुन त्यांचे मुख्यालय ज्या तालुक्यात आहे. अशा उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडेस सादर करावेत, असे आवाहन गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम