सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

भैय्यासाहेब गंधे सभागृह जिल्हा पेठ जळगाव येथे रंगला शास्त्रीय संगीत महोत्सव

बातमी शेअर करा...

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

भैय्यासाहेब गंधे सभागृह जिल्हा पेठ जळगाव येथे रंगला शास्त्रीय संगीत महोत्सव

जळगांव प्रतिनिधी

: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा ०२ ते ०४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सायंकाळी ६ ते १० या वेळेत वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृह, जिल्हा पेठ, जळगाव या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना मा. सांस्कृतिक कार्यमंत्री मा. श्री.ॲड आशिष शेलार यांची असून, श्री. विकास खारगे मा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा माहिती अधिकारी श्री युवराज पाटील, लोक कलाकार श्री विनोद ढगे, स्व. वसंतराव प्रतिष्ठाण चे अध्यक्ष विवेकानंद कुलकर्णी तसेच सहसंचालक श्रीराम पांडे हे हजर होते. प्रस्ताविक सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले तर या महोत्सवास जिल्हा माहिती अधिकारी श्री युवराज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. 02 फेब्रुवारी, 2025 रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक गायक चैतन्य परब, ख्यातनाम गायिका अमृता काळे, विख्यात सारंगीवादक साबीर खान, ज्येष्ठ गायक पंडित हरीश तिवारी यांचे सादरीकरण झाले. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. 3 फेब्रुवारी रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक ऋतुराज धुपकर व कृष्णा साळुंखे, प्रसिध्द गायक अनुरत्‍न रॉय, बासरीवादक चिंतन कट्टी व ज्येष्ठ गायक धनंजय जोशी यांचे सादरीकरण होणार आहे मंगळवारी 4 फेब्रुवारी 2025 रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक जगन्‍मित्र लिंगाडे व यश खडके यांची जुगलबंदी, प्रसिध्द गायिका रौकिंणी गुप्ता यांचे गायन होणार आहे तर पद्मश्री पंडित रोणू मुजुमदार व ऋषिकेश मुजुमदार यांचे बासरी सहगायन व ज्येष्ठ गायक पंडित आनंद भाटे यांचे गायन असे नामवंत कलाकार आपली शास्त्रीय संगीत गायन व वादन कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमास स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांनी सहकार्य केले आहे. रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री विभीषण चवरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम