साईनगरात बंद घर फोडून २८ हजारांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा...

साईनगरात बंद घर फोडून २८ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव (प्रतिनिधी) – शहरालगतच्या निमखेडी शिवारातील साईनगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी, २१ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना समोर आली असून, मंगळवारी २२ जुलै रोजी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नचिकेत सुभाष सोनवणे (वय २६, रा. साईनगर, निमखेडी शिवार) हे कुटुंबासह वास्तव्यास असून, खाजगी सिव्हिल इंजिनिअर म्हणून नोकरी करतात. १९ जुलै ते २१ जुलै दरम्यान त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २८ हजारांचा ऐवज चोरून नेला. नचिकेत सोनवणे यांनी २१ जुलै रोजी दुपारी घरी परतल्यावर घर फोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ तालुका पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी नचिकेत यांनी २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक कैलास इंगळे हे करत आहेत.


बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम