साकळी महसूल मंडळाची कारवाई; अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

बातमी शेअर करा...

साकळी महसूल मंडळाची कारवाई; अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

यावल, प्रतिनिधी – शुक्रवार, दिनांक ६ जून २०२५ रोजी साकळी महसूल मंडळाच्या पथकाने थोरगव्हाण-पिळोदे रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सदर ट्रॅक्टरची तपासणी व कारवाई साकळी भाग मंडळ अधिकारी श्री. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महसूल सेवक गणेश महाजन (साकळी), विजय भालेराव (मनवेल), आणि विकास सोळंके (न्हावी, प्र.अडावद) यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे वाहन पकडण्यात आले.

ही कारवाई यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. कारवाईदरम्यान दहिगाव येथील ग्राम महसूल अधिकारी मिलिंद कुरकुरे, सातोदचे अधिकारी कुंभार आप्पा, तसेच महसूल सेवक विजय साळवे, रामा कोळी, अरविंद बोरसे यांच्यासह पोलिस विभागाचेही अमूल्य सहकार्य लाभले.

प्रशासनाच्या या तातडीच्या आणि ठोस कारवाईमुळे स्थानिक पातळीवरील अवैध रेती वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महसूल विभागाच्या पुढील कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम