
साने गुरुजींच्या विचारांवर आधारित घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत शुभम बडकस प्रथम
स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्सहात्
साने गुरुजींच्या विचारांवर आधारित घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत शुभम बडकस प्रथम
स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्सहात्
जळगाव (प्रतिनिधी)- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत कार्यरत पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने साने गुरुजींच्या विचारांवर आधारित घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पुणे येथील शुभम बडकस याने प्रथम, मुंबईच्या पुजा देशमुखने द्वितीय पारितोषिक प्राप्त केले.
दिनांक २७ मार्च २०२५ रोजी या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले यावेळी ‘तरुणांसाठी साने गुरुजी’ या विषयावर साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त गोपाल नेवे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे होते. तसेच विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. किशोर पवार, जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी संस्कार केंद्राचे विभागप्रमुख डॉ. रोहन कोष्टी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर निवडक लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच ‘खरा तो एकची धर्म’ आणि ‘बलसागर भरत होवो’ ही प्रेरणादायी गीते प्रगती अडावदकर हिने सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृपा देसले यांनी केले, तर शेवटी गौरव हरताळे यांनी आभार मानले. गोपाल नेवे यांनी साने गुरूजींचे विचार तरूणांसाठी आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रा. पगारे यांनी साने गुरूजी हे मानवतावादी होते असे सांगतांना काही उदाहरणे दिली.
लघुपट स्पर्धेतील विजेते: प्रथम पारितोषिक – खरा तो एकची धर्म (शुभम बडकस, पुणे), द्वितीय पारितोषिक – श्याम विरुद्ध श्याम (पूजा देशमुख, मुंबई), तृतीय पारितोषिक – संयुक्त विजेते: बेबी सरोजा (शुभम नेहारे, काटोल) आणि भूतदया (विनय संजय पाटील, जळगाव)

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम