
सामाईक शेतीच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाला मारहाण
सामाईक शेतीच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाला मारहाण
जळगाव : सामाईक शेतीच्या वादातून मोठ्या भावासह त्याच्या कुटुंबाने लहान भाऊ ताराचंद मंगल सोनवणे (वय ५०, रा. पडसोद, ता. जळगाव, ह. मु. नाशिक) यांना लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता पडसोद शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक येथे राहणारे ताराचंद सोनवणे यांची पडसोद गावातील शिवारात सामाईक शेती आहे. दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता ते शेतात गेलेले असतांना तेथे त्यांचा
मोठे भाऊ हिरामण सोनवणे यांच्यासोबत वाद झाला. त्यांच्यातील वाद वाढतच गेल्याने हिरामण सोनवणे व त्यांची पत्नी यांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लाकडी काठीने त्यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, उपचार घेतल्यानंतर ताराचंद सोनवणे यांनी तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित हिरामण मंगल सोनवणे, सुनंदाबाई हिरामण सोनवणे, बेबाबाई प्रल्हाद बाविस्कर (सर्व रा. पडसोद, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दीपक चौधरी हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम