सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 5 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगाव या कार्यालयाशी संबधित असलेल्या नागरीकांच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्या यांचे होणार निराकरण

बातमी शेअर करा...

जळगाव प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने 100 दिवसाचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगाव या कार्यालयाशी संबधित असलेल्या नागरीकांच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्या इत्यादी जाणून घेवून त्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी 5 मार्च 2025 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगाव, डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदौरा समोर महाबळ रोड जळगाव येथे सकाळी ११.०० ते दु.१.०० या वेळेत लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे. अशी माहिती योगेश साटील सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगाव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम