
सायकल चालवा, पर्यावरण वाचवा! बहिणाबाई विद्यापीठात जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली
सायकल चालवा, पर्यावरण वाचवा! बहिणाबाई विद्यापीठात जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली
जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून आज मंगळवारी (३ जून २०२५) सकाळी ७ वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
यावेळी प्रा. इंगळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “सायकलचा वापर केल्याने केवळ आरोग्य सुदृढ राहते असे नव्हे तर प्रदूषणही कमी होते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सायकल चालवणे ही काळाची गरज आहे.”
रॅलीत विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा. सचिन नांद्रे, प्रा. किशोर पवार, प्रा. दीपक दलाल, प्रा. मनोज पाटील, जळगाव सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश चौधरी, धुळे सायकल मार्टचे समीर रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने सायकलप्रेमी सहभागी झाले होते. राम घोरपडे, रूपेश महाजन, डॉ. अनघा चोपडे, डॉ. सुयोग चव्हाण, रूपाली पाटील, अजय पाटील, वैभव बडगुजर, रोहित महाजन आदींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
रॅली यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कक्ष अधिकारी शरद पाटील, कर्मचारी शिवाजी पाटील, कैलास औटी, विजय बिऱ्हाडे, विलास पाटील, सौरभ साबळे व वैभव बाविस्कर यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.
सायकल रॅलीमुळे विद्यापीठ परिसरात पर्यावरणपूरक व आरोग्यदायी जीवनशैलीविषयी जनजागृती घडवण्यात आली. उपस्थितांनी सायकल वापराचे फायदे प्रत्यक्ष अनुभवले आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम