सायबर भामट्यांनी बनवली महावितरणची बनावट वेबसाइट, नोकरभरतीच्या नावाखाली फसवणुकीचा डाव

बातमी शेअर करा...

सायबर भामट्यांनी बनवली महावितरणची बनावट वेबसाइट, नोकरभरतीच्या नावाखाली फसवणुकीचा डाव

जळगाव : सायबर गुन्हेगारांनी महावितरण कंपनीची बनावट वेबसाइट तयार करून खोट्या नोकरभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट वेबसाइटद्वारे शिपाई, वॉचमन, वाहतूक कामगार आणि सफाई कामगार यासारख्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामुळे बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणने याबाबत सायबर क्राइम विभागाकडे तक्रार नोंदवली असून, नागरिकांना या फसव्या जाहिरातीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.महावितरणच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर भामट्यांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटसारखी दिसणारी बनावट वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटवर खोट्या नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करून बेरोजगार तरुणांना अर्ज करण्यास प्रवृत्त केले जात आहे. अर्ज प्रक्रियेच्या नावाखाली भामटे तरुणांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. या बनावट जाहिरातीमुळे अनेक तरुण फसवणुकीला बळी पडण्याची भीती आहे.महावितरणने स्पष्ट केले आहे की, त्यांची कोणतीही नोकरभरती प्रक्रिया सध्या सुरू नसून, अधिकृत भरती प्रक्रियेची माहिती फक्त महावितरणच्या अधिकृत वेबसाइट (www.mahadiscom.in) आणि नामांकित वृत्तपत्रांमधूनच दिली जाते. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद वेबसाइट किंवा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये आणि अशा साइटवर वैयक्तिक माहिती किंवा पैसे जमा करू नयेत, असे आवाहन कंपनीने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम