
सार्वजनिक जागी गांजाचे सेवन करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा
सार्वजनिक जागी गांजाचे सेवन करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील विविध ठिकाणी ‘गांजा या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी कारवाई केली.ही कारवाई शहर, एमआयडीसी, रामानंदनगर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
मेहरूण गार्डन परिसरात, गणेश गुलाबचंद कस्तुरे (वय २३, रा. कुसुंबा) आणि दीपक प्यारेलाल चव्हाण (वय २९, रा. सुप्रीम कॉलनी) हे महाव मंदिरासमोरील मोकळ्या जागेत चिलीमने गांजा पिताना सापडले.
शिवाजीनगर उड्डाण पुलाखाली, जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागे मो. साजिद अब्दुल गनी शेख (वय ४३, रा. उमर कॉलनी) आणि विजय भगवान लोहार (वय ३७, रा. शिवाजीनगर हुडको) हेही अशाच अवस्थेत आढळले.
केळकर मार्केटमागे, खान्देश मिल कामगार भवनाच्या बंद इमारतीत बाळू पीतांबर सपकाळे (वय ३२, रा. कांचननगर) हा गांजा सेवन करताना आढळून आला.
पिंप्राळा हुडको परिसरात जुबेर उस्मानखान पठाण (वय ३०) हा चिलीमने गांजा पिताना आढळून आला.
निमखेडी शिवारात गिरणा नदीपात्राजवळ दीपक श्रावण गायकवाड (वय ३८, रा. सत्यम पार्क) आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे खुलेआम गांजा सेवन करत होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम