सालार फाऊंडेशन – हैदर ग्रुप तर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वितरण व रक्तदान शिबीर

बातमी शेअर करा...

सालार फाऊंडेशन – हैदर ग्रुप तर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वितरण व रक्तदान शिबीर

जळगाव समता नगर येथे सालार फाऊंडेशन तर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.

तसेच, हैदर ग्रुपच्या पुढाकाराने ३१ ऑगस्ट २०२५ रोजी समता नगर, जळगाव येथे ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात रक्त संकलनाचे कार्य रेड प्लस सोसायटी तर्फे करण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महानगराध्यक्ष एजाज अब्दुल गफ्फार मालिक, रामानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संजू तडवी, सालार फाऊंडेशनचें इरफान सालार, पी.डी.डी. चें युवा अध्यक्ष शाहिद पटेल, समीरभाई, आसिफ अनवर, पो. का. संदीप बीराडे, उमर मालिक व हैदर ग्रुपचें सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्तदाते म्हणून समीरभाई, आकाश करडे, फरहान शेख, प्रवीण शेंगदाणे, महेंद्र लोहार, संतोष लोहार यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम