सावखेडा जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ।

बातमी शेअर करा...

सावखेडा जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ।
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम
सावदा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या वतीने रावेर तालुक्यातील सावखेडा जिल्हा परिषद शाळेतील गरजू विदयार्थ्यांना आज दिनांक ८ रोजी शालेय साहित्य संघटनेचे खान्देश विभागीय कार्यध्यक्ष संतोष नवले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश सैतवाल, जिल्हा संघटक दिपक श्रावगे, जिल्हा सल्लागार कैलास लवंगडे, तालुकाध्य रवींद्र महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटना प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी राज्यभर काम करणारी संघटना असून सोबतच समाजाचं देणं लागतं या कृतज्ञता भावनेतून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून समाजहिताचं काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत आंबेकर यांनी केले तर आपले मनोगत पत्रकार दीपक श्रावगे यांनी मांडले. याप्रसंगी नवनिर्वाचित खान्देश विभाग कार्याध्यक्ष पदी देशदूतचे पत्रकार संतोष नवले तर जळगाव लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी लोकमत पत्रकार योगेश सैतवाल यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सावखेडा बुद्रुक चे सरपंच युवराज कराड, ग्रामपंचायत सदस्य अल्लाउद्दीन तडवी ,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अहमद तडवी, सदस्य गोपाल पाटील, सारंग पाटील, रमेश पाटील, लतीफ तडवी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेचे पदाधिकारी पत्रकार कैलास लवंगडे ,पत्रकार दिपक श्रावगे, शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम