
सावखेडा येथे गरजूंसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ कलेक्टर कार्यालयात प्रकल्पाचा आढावा सादर
सावखेडा येथे गरजूंसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ
कलेक्टर कार्यालयात प्रकल्पाचा आढावा सादर
सावखेडा (ता. जामनेर) | दि. 10 जुलै 2025
नेटवर्क ऑफ महाराष्ट्र पीपल लिविंग विथ एच.आय.व्ही., जळगाव यांच्या वतीने, टाटा एआयजी आणि स्वस्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त पाठिंब्याने सावखेडा गावात सोशल प्रोटेक्शन स्कीम प्रकल्पाअंतर्गत विविध योजनांचा लाभ गरजू नागरिकांना देण्यात आला.
यामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया, ई-श्रम कार्ड नोंदणी, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनांचा समावेश होता. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.
दरम्यान, 11 जुलै रोजी स्वस्ती फाउंडेशनच्या शेहनाज शेरीफ, एन.एम.पी.प्लसच्या प्रकल्प जिल्हा समन्वयक अनिता पाटील व मनिषा साळुंखे (पुणे) यांनी टीमसह जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी मागील वर्षातील प्रकल्पाची माहिती व कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केला.
जिल्हाधिकारी यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि संबंधित शासकीय विभागाशी टीमची ओळख करून दिली. भविष्यात गरज भासल्यास थेट संपर्क करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या भेटीअंती अनिता पाटील यांनी टीमतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम