सावखेडा येथे सोशल प्रोटेक्शन योजनांचा लाभ; कलेक्टर कार्यालयात प्रकल्पाचा आढावा सादर

बातमी शेअर करा...

सावखेडा येथे सोशल प्रोटेक्शन योजनांचा लाभ; कलेक्टर कार्यालयात प्रकल्पाचा आढावा सादर

जळगाव– नेटवर्क ऑफ महाराष्ट्र पीपल लिविंग विथ एचआयव्ही – जळगाव यांच्या पुढाकाराने, टाटा एआयजी आणि स्वस्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने सावखेडा गावात दिनांक 10 जुलै 2025 रोजी ‘सोशल प्रोटेक्शन स्कीम्स’ प्रकल्प अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या उपक्रमात आयुष्मान भारत कार्डसाठी ई-केवायसी, ई-श्रम कार्ड नोंदणी, तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला. या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यानंतर, 11 जुलै 2025 रोजी स्वस्ती फाउंडेशनच्या शेहनाज शेरिफ, एन.एम.पी.प्लसच्या प्रकल्प जिल्हा समन्वयक अनिता पाटील आणि मनिषा साळुंखे (पुणे) यांनी त्यांच्या टीमसह जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय कलेक्टर सो. आयुष प्रसाद यांची भेट घेऊन मागील वर्षातील कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला.

कलेक्टर साहेबांनी टीमच्या कार्याचे कौतुक करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी संबंधित विभागांशी कार्यसंवाद साधण्याकरिता मदतीचं आश्वासन दिलं आणि भविष्यात कुठलीही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्यास सांगितले. यावेळी अनिता पाटील यांनी संपूर्ण टीमच्या वतीने कलेक्टर साहेबांचे आभार मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम