सावदासह परिसरातील अवैध धंदे बंद करा – रमाकांत तायडे

बातमी शेअर करा...

सावदासह परिसरातील अवैध धंदे बंद करा – रमाकांत तायडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा

सावदा ता रावेर प्रतिनिधी सावदा हद्दीत येणाऱ्या बहुतेक गाव खेड्यात विशेषता सावदा शहरात अवैध धंदे चरम सीमेवर आहेत त्यामुळे स्थानिक लोक त्रस्त झाले असून कितीतरी लोकांचे संसार या पत्ता, सट्टा,जुगार,ऑनलाईन जुगार,यामुळे रस्त्यावर आलेले आहेत.अशी मागणी रमाकांत आर तायडे यांनी सावदा पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे .

निवेदनात म्हटले की , स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ राज्य महासचिव या नाते तक्रार वजा विनंती करतो की आपण जातीने लक्ष घालून या पत्ते कल्ब वाल्यांना तसेच जुगार अड्डे मालकांना तात्काळ बंद करण्याचे आदेश कराल.सावदा शहरात आपली प्रतिमा एका कर्तव्यध्यक्ष अधिकाऱ्याची असून ती तशीच कायम राहावी अशी इच्छा आहे आपणास विनंती करतो की लवकरात लवकर सर्व अवैद्य धंदे कायमस्वरूपी बंद करावे अन्यथा येणाऱ्या दि14 एप्रिल रोजी पत्रकार संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू करेल कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची आपण दक्षता घ्यावी, अशी मागणी रमाकांत तायडे यांनी केली आहे .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम