सावदा डेली भाजी मार्केटमधील अतिक्रमण हटवले

इतर अतिक्रमणावर कारवाई होणार का?

बातमी शेअर करा...

सावदा डेली भाजी मार्केटमधील अतिक्रमण हटवले

इतर अतिक्रमणावर कारवाई होणार का?

सावदा (प्रतिनिधी) – सावदा शहरातील डेली भाजी मार्केट परिसरात एका बेरोजगार तरुणाने व्यवसायासाठी टपरी उभारली होती. मात्र, हे अतिक्रमण असल्याचे लक्षात येताच दि. २ एप्रिल रोजी सावदा नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात तात्काळ कारवाई करत ते अतिक्रमण हटवले.

कारवाई दरम्यान परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. टपरीधारक व काही नागरिकांनी पालिकेच्या कारवाईवर आक्षेप घेत “फक्त एका टपरीवरच कारवाई का?” असा सवाल उपस्थित केला. शहरात यापेक्षा मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पालिकेकडून मात्र या कारवाईला “नियमित कार्यवाही” असे म्हणत अतिक्रमण हटवण्यात आले.

कारवाईनंतर संतप्त नागरिकांनी नगरपालिकेत धाव घेत मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना प्रश्नांचा सामना करायला लावला. “शहरातील मुख्य रस्ते, चौक, बस स्थानक परिसर, चावडी भाग, वसाहती व नगरपालिका जागांवरील मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई का होत नाही?” असा सवाल त्यांनी केला.

मुख्याधिकारी वर्मा यांनी यावर स्पष्टीकरण देताना, “ही अतिक्रमणे आमच्या कार्यकाळातील नाहीत, नागरिकांनी लेखी तक्रार दिल्यास कारवाई केली जाईल,” असे उत्तर दिले. मात्र हे उत्तर नागरिकांना समाधानकारक वाटले नाही. यामुळे काही वेळ पालिकेसमोर आंदोलक नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला.

नागरिकांचा आक्षेप आहे की, जर अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात असेल तर ती एकतर्फी न करता, सर्व अतिक्रमणांवर सरसकट केली पाहिजे. अन्यथा पालिकेच्या भूमिकेत पक्षपातीपणा असल्याचा आरोप वाढू शकतो.

आता नगरपालिकेचे प्रशासन आणि प्रशासक शहरातील उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम